Theme Layout

Theme Translation

Trending Posts Display

Home Layout Display

Posts Title Display

404

We Are Sorry, Page Not Found

Home Page

अहमदनगर  - राज्यातील सत्तेचा विषय आता संपला असून आता नगरकरांसोबत राज्यातील नेत्यांच्या नजरा नगर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीकडे आहेत. 21 जानेवारीपूर्वी जिल्हा परिषदेत नव्या अध्यक्षांसह अन्य पाच प्रमुख पदाधिकार्‍यांच्या निवडी होणार असून या ठिकाणी देखील राज्यातील महाआघाडीचा फॉम्यूला कायम राहणार की विद्यमान अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील या सत्ता राखण्यात यशस्वी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, काहीही झाले तरी नगर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत कायद्याचा किस निघणार हे नक्की आहे.
राज्यात सत्ता समिकरणे बदलल्याने त्याचे पडसाद नगर जिल्हा परिषदेत उमटण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत नव्याने महाविकास आघाडीची सत्ता येणार की विद्यमान अध्यक्षा विखे यांच्या रुपाने भाजपचा झेंडा रोवला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभेपूर्वी जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलली होती. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याबरोबर भाजपमधून देखील काहींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने जिल्हा परिषदेच्या संख्याबळात बदल झाला आहे. तांत्रिकदुष्ट्या हे सदस्य आजही मुळ पक्षात असले तरी मनाने आणि त्यांचे नेत मात्र ते नव्या पक्षात आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगलीच मुसंडी मारली. 12 जागांपैकी सहा जागा मिळविल्या तर भाजपला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले.


त्यात राज्यात देखील सत्ता समिकरण बदलले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची महाविकासआघाडी आता सत्तारुढ झाली आहे. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीमुळे जिल्हा परिषदेत आता राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळून शकते. 2016 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या होत्या. त्या खालोखाल राष्ट्रवादी 19, भाजप 14, शिवसेना 7, शेतकरी क्रांतीकारी पक्ष 5, महाआघाडी 2, भाकप 1, जनशक्ती 1, अपक्ष 1 असे संख्याबळ होते. राष्ट्रवादीचे 19, मूळ काँग्रेसचे 10 व शिवसेना 7 तसेच शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे 5 असे समिकरण जुळू शकते. काँग्रेसचे 23 सदस्य असले तरी विखे पाटील यांच्या गटाला मानणारे 13 सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी 37 सदस्यांचा बहूमताचा आकडा आवश्यक आहे. राज्यात ज्या प्रमाणे महाविकासआघाडीचे घटक पक्ष एकत्र आलेले आहेत. तोच प्रयोग नगर जिल्ह्यात झाल्यास या ठिकाणी विखे यांना सत्तेपासून रोखणे शक्य आहे. मात्र, 2007 च्या निवडणुकीचा अनुभव पाहता जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी विखे गट कोणताही प्रयोग करून शकतात. या शिवाय झेडपीतील संभाव्य महाविकासआघाडीत आज सर्वात मोठा राष्ट्रवादी असून राष्ट्रवादीकडून घुले, जगताप आणि ढाकणे हे स्पर्धेत राहू शकतात. मात्र, विखे गटाच्या विरोधात कोण दंड थोपटील हे पोहणे गरजेचे  ठरणार आहे. यापूर्वीच्या 10 ते 15 वर्षातील जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा विचार केल्यास शिवसेनेचे सदस्य नेहमीच विखे गटासोबत राहिलेले आहेत. यामुळे यंदा देखील त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यापूर्वी अनेक निवडणूकांमध्ये नगर जिल्हा परिषदेतील राजकारणात कायद्याचा किस निघालेला असून यंदा देखील त्याला अपवाद ठरणार नसल्याचे दिसत आहे.
..................
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रतोद भाजपमध्ये
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे प्रतोद कैलास वाकचौरे आणि  काँग्रेसच्या प्रतोद आशाताई दिघे या विखे गटासोबत असून मनाने दोघेही भाजपमध्ये आहेत. तांत्रिकदृष्ट्या हे दोघे सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये दिसत असल्याने पदाधिकारी निवडीपूर्वी त्यांचे प्रतोद पद राहणार की त्यावर गंडांतर येणार याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष आहे. यासाठी आतापासून कायद्याच्या बाबींचा आधार घेण्यात येत आहे.

विखेंकडून श्रध्द आणि सुबरीचा सल्लाजिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत शालीनीताई विखे यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी श्रध्द आणि सुबरीचा मंत्र सांगितला होता. यामुळे अध्यक्षपदावरून शालीनीताई विखे पाटील या अत्यंत सावध असून राज्यातील सत्तास्थापने वेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी विखे गट टाळणार असल्याचे संकेत मिळत  आहेत.

थोरात-पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
जिल्ह्यात राजकारणात शांत आणि संयमी म्हणून ओळख असणार्‍या आ. बाळासाहेब थोरात आणि ज्यांचा जिल्ह्यात नव्याने राजकीय उदय झाला असे नतून आ. रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषदेतप्रमाणे नगर जिल्हा परिषदेत लक्ष घालणार का याकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष राहणार आहे.