जामखेड येथील डॉ. सुरज काशीद हे एमडी मेडिसीन परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत
डॉ. सुरज काशीद हे जामखेड येथील सुप्रसिद्ध डॉ. सुरेश काशीद आणि डॉ. विद्या सुरेश काशीद यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. डॉ. सूरज यांनी एमबीबीएस ची पदवी पुणे येथून घेतली. तर धुळे येथून त्यांनी एमडी मेडीसिन ची पदवी संपादन केली.
डॉ. सुरज काशीद यांच्या या यशाने तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.
या वेळी अॅड. बाळासाहेब बागल, डॉ दिलीप बागल, अॅड. सुनीता बागल, डॉ नीलम बागल, अॅड. रोहन बागल, डॉ विद्या काशीद, डॉ सुरेश काशीद, इजि. ऋषिकेश बागल हे उपस्थित होते.