Theme Layout

Theme Translation

Trending Posts Display

Home Layout Display

Posts Title Display

404

We Are Sorry, Page Not Found

Home Page

 

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी झेन्सर टेक्नॉलॉजिज कंपनीत नोकरीसाठी निवड झाल्या बध्दल सत्कार केला.


                 संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने सॅप (System Applications & Products ) या सॉफ्टवेअर कंपनीशी  सामंजस्य करार (एमओयु) केलेला आहे. त्यामुळे या कोर्सचे प्रशिक्षण  एका स्वतंत्र विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाते. तसेच संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड  पी) विभाग आपल्या विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्यासाठी संपर्क करतो. अशाच  सॅप विभाग व टी अँड  पी विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नातुन झेन्सर टेक्नॉलॉजिज या कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यात कंपनीने अंतिम वर्षातील १५ विद्यार्थ्यांची चांगल्या वार्षिक  पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी  माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

         झेन्सर टेक्नॉलॉजिज ही एक डिजिटल सोल्युशन्स आणि टेक्नॉलॉजी सर्विसेस कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असुन तिचे अस्तित्व जगभर आहे. या कंपनीने नोकरीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पयुटर इंजिनिअरींगच्या राजवर्धन विलास जाधव, सिध्दांत सुधाकर नवथर, श्रीजित पोपट पानगव्हाणे, वेदांत निवृत्ती गोर्डे, गौरी बाबासाहेब चांदर, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रोहित दत्तात्रय बुळे, शंतनू  गोरक्षनाथ ढोकळे, वैभव परशराम वेताळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड  कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या शुभांगी  प्रमोद आहेर, अथर्वराज सुभाष  चोरमुंगे, हर्षद  अतुल देसाई, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगची स्नेहा बाळासाहेब शेळके, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या ऋतिका आण्णासाहेब जाधव, आकांक्षा अरूण कार्ले व शुभम  आण्णासाहेब देवगिरे यांचा समावेश  आहे.