Theme Layout

Theme Translation

Trending Posts Display

Home Layout Display

Posts Title Display

404

We Are Sorry, Page Not Found

Home Page



हैदराबाद : काही दिवसांपूर्वीच घडलेल्या महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश सुन्न झाला होता. आरोपींना कठोर शिक्षेची मागणी देशभरातून होत होती. पण शुक्रवारची सकाळ सर्वांसाठी वेगळी ठरली. आरोपींनी ज्या ठिकाणी निर्घृण कृत्य केलं होतं, त्याच ठिकाणी त्यांचा खात्मा झाला. घटनास्थळावर आरोपींना नेण्यात येत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी झालेल्या चकमकीत चारही आरोपींचा खात्मा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या या कामगिरीचं लोकांकडून कौतुक करण्यात येत आहे. घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांवर लोकांनी पुष्पवर्षावही केला.

हैदराबादचे 'सिंघम'; सोशल मीडियावर 'सॅल्यूट'


एनकाऊंटरची माहिती मिळताच घटनास्थळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. ज्याच्या कानावर ही माहिती पडली, त्याने घटनास्थळाकडे धाव घेतली. लोकांना सांभाळण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनतही करावी लागली. जमाव पाहता अतिरिक्त तुकडी मागवण्यात आली.