वेब टीम : मुंबई
अभिनेता आयुषमान खुरानाची सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘अंधाधुन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारा बरोबरच ‘बधाई हो’तील कामासाठीही त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आता त्याचा ‘बाला’ चित्रपट येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला.आयुषमानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘बाला’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.
नेहमीच हटके लुकमध्ये दिसणाऱ्या आयुषमाने या चित्रपटातही प्रेक्षकांना त्याच्या लुकने उत्सुक केले.टीझरमध्ये आयुषमान दुचाकीवर बसून आनंदात ‘कोई ना कोई चाहिए प्यार करन वाला’हे गाणे गाताना दिसतो.
अचानक जोराचा वारा सुटतो आणि त्याच्या डोक्यावरची टोपी उडून जाते. अन् त्याचे टक्कल दिसते. त्यामुळे तो नाराज होतो आणि ‘रहने दो छोड़ो भी जाने दो यार’हे गाणे गाताना दिसतो.
आयुषमानच्या इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटातही सहज साधा विषय हाताळलेला दिसणार यात शंका नाही.हा चित्रपट येत्या १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर आयुषमानसोबत दिसणार असून ती एका सावळ्या मुलीची व्यक्तीरेखा साकारात आहे.भूमी आणि आयुषमान या दोघांचा एकत्र हा तिसरा चित्रपट आहे.