वेब टीम : विजयनगर
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासमोरील अडचणी कमी होण्यास तयार नाहीत.
दिवसेंदिवस नवीन अडचणी समोर येत आहेत. तेलुगू देसम पक्षाच्या जवळपास ६० नेत्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह रविवारी भाजपात प्रवेश केला असल्याचे वृत्त आहे.
भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
यासंदर्भात बोलताना काही महिन्यांपूर्वी टीडीपी सोडून भाजपात सामील झालेले लंका दिनकर म्हणाले क ी, आमच्या आंध्र प्रदेश व तेलंगणा शाखेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तेलुगू देसम पार्टीतून आज जवळपास ६० नेत्यांनी भारतीय जनता पक्षात केलेला प्रवेश पाहता लोकांमध्ये माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर असलेला राग प्रकट होत आहे. यामध्ये काही राष्ट्रीय नेते आहेत, तर काही जिल्हास्तरीय नेते आहेत..