Theme Layout

Theme Translation

Trending Posts Display

Home Layout Display

Posts Title Display

404

We Are Sorry, Page Not Found

Home Page

टाेकियाे : जपानमध्ये पुढील वर्षी हाेणाऱ्या टाेकियाे ऑलिम्पिकचे मुख्य स्टेडियम तयार झाले आहे. यात ८६ % लाकडाचा उपयाेग केला आहे. २००० घनमीटर देवदारच्या लाकडाचा वापर केला आहे. ही लाकडे २०११ च्या सुनामीमध्ये उद‌्ध्वस्त झालेल्या ४७ प्रांतातल्या जंगलातून आणण्यात आली आहेत. प्रेक्षक निसर्गाच्या सान्निध्यात राहावेत व त्यांना गर्मी हाेऊ नये असा उद्देश आहे. त्यासाठी येथे १८५ माेठे पंखे व ८ ठिकाणी कुलिंग नाेझलही लावले आहेत. ५ मजली स्टेडियम बांधण्यासाठी अंदाजे १० हजार काेटी रुपये खर्च आला. येथे ६० हजार प्रेक्षक बसू शकतील.
एक जानेवारीला हाेणार पहिला सामना
येथे पहिला सामना पुढील वर्षी पहिला सामना एम्परर फुटबाॅल चषकाच्या अंतिम सामान्याने हाेईल. टाेकियाे ऑलिम्पिक २४ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत चालेल. २५ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर पॅरा ऑलिम्पिक हाेतील. स्टेडियमचे डिझाइन जपानचेे आर्किटेक्ट केंगो कुमा यांनी तयार केले आहे.
ई-कचऱ्यापासून बनवलेली ५,००० पदके देण्यात येणार
ऑलिम्पिकचे ६० % व्हेन्यू रियुज्ड व रिसायकल वस्तुंपासून बनत आहेत. स्टेडियमचे सर्व दिवे साैर ऊर्जेवर चालतील. ऑलिम्पिकमध्ये ई-कचऱ्यापासून बनवलेली ५ हजार पदके दिल्या जातील. ई कचऱ्यासाठी लाेकांनी ८० हजार वापरलेले माेबाइल, स्मार्टफाेन व टॅब्लेट दिले आहेत. या ठिकाणी चालकरहित टॅक्सीचा पहिल्यांदाच उपयाेग करण्यात येणार आहे.
आतून असे दिसते मुख्य स्टेडियम