Theme Layout

Theme Translation

Trending Posts Display

Home Layout Display

Posts Title Display

404

We Are Sorry, Page Not Found

Home Page

एडिनबर्ग : ब्रिटनच्या जेसी डफ्टन स्कॉटलंडमधील “ओल्ड मॅन ऑफ हाॅय’ डोंगर चढणारा जगातील पहिला अंध गिर्यारोहक बनला आहे. जेसीने ४५० फूट उंच डोंगराची ७ तासांत चढाई पूर्ण केली. ही चढाई पूर्ण करण्यासाठी त्याला त्याची प्रियकर माॅली थॉम्प्सनने मदत केली. जेसी व थॉम्प्सन २००४ पासून सोबत गिर्यारोहण करतात. लाल मातीच्या दगडाचा हा डोंगर नॉर्थ कोस्ट परिसरात आहे. या डोंगरावर १९६६ पासून गिर्यारोहण होते. सर्वात पहिले ब्रिटनच्या दिग्गज माउंटेनियर क्रिस बोनिंगटनने चढाई केली होती. जेसी म्हणाला की, हे डोंगर संरक्षित परिसरात आहे. त्यामुळे चढाईला अडचणी येतात. ते समुद्रकिनारी असल्याने त्यात चुना आहे. मी हा डोंगर चढणारा पहिला अंध गिर्यारोहक बनू इच्छित होताे. ते मी करून दाखवले. चढाईच्या वेळी इतर गोष्टीबाबत विचार करू शकत नाही. केवळ ते म्हणजे उभी चढाई कशी करायची आणि चढाई पूर्ण कशी करता येईल, हेच डोक्यात ठेवावे लागते.
जन्मताच जेसीची दिसण्याची क्षमता केवळ २० टक्के
जेसीला जन्मताच दिसण्याची केवळ २० टक्के क्षमता आहे. मात्र, वाढता वयाबरोबर तीही कमी झाली. सध्या त्याला केवळ १ टक्का दिसते. जेसी म्हणतो की, “मी अधिक वस्तू ओळखू शकत नाही. मी केवळ लाइट कुठे चालू आहे हे सांगू शकते. मी जेव्हा माझा हात चेहऱ्यापुढे आणून बोटे हलवते तेव्हाच माझा हात पाहू शकताे.’ जेसीचे वडीलदेखील गिर्यारोहक आहेत. वडिलांनी जेसीला गिर्यारोहण शिकवले. जेसीने वयाच्या दुसऱ्या वर्षी गिर्यारोहण केले. दृष्टी एवढी कमी असतानाही तो वयाच्या १६ व्या वर्षापर्यंत रग्बी व जुजित्सू खेळत होता. काही काळानंतर गिर्यारोहण त्याचा आवडता खेळ झाला. त्यानंतर त्याचे संपूर्ण जगच गिर्यारोहण बनले. जेसीची २०१७ मध्ये ब्रिटनच्या पॅराक्लायंबिग संघात निवड झाली होती. ताे जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानी होता.