Theme Layout

Theme Translation

Trending Posts Display

Home Layout Display

Posts Title Display

404

We Are Sorry, Page Not Found

Home Page


नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा  केली आहे. दिल्लीकरांना वीज, पाणी, बससेवा हे सर्व मोफत दिल्यानंतर आता वायफायही फ्री मिळणार आहे.
केजरीवाल यांनी बुधवारी  ही घोषणा केली. आम आदमी पक्षाची ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजना मानली जात आहे. येत्या 16 डिसेंबरपासून दिल्लीकरांना या फ्री वायफाय योजनेचा उपभोग घेता येणार  आहे.
दिल्लीत पहिल्या टप्प्यात जवळपास 11 हजार वायफाय हॉटस्पॉट लावण्यात येतील असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. येत्या 16 डिसेंबरला 100 हॉटस्पॉटचे उद्धाटन करण्यात येणार असून त्याच दिवसापासून ते सुरु करण्यात येणार आहे.
दरम्यान, दिल्लीत फ्री वायफाय देण्याचा निर्णयाला कॅबिनेटमध्ये मंजूरी देण्यात आली आहे. त्याची टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.