Theme Layout

Theme Translation

Trending Posts Display

Home Layout Display

Posts Title Display

404

We Are Sorry, Page Not Found

Home Page


मुंबई - पृथ्वीराज चव्हाण यांचा राज्य कारभारच वांझोटा होता असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. डोंबिवलीतल्या सभेत राज ठाकरे बोलत होते. पूर्वी सिनेमात राजशेखर नावाचे खलनायक काम करायचे त्यांच्याप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाण दिसतात. त्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना जो काही कारभार केला तो वांझोटा होता. त्या कारभाराचा ना त्यांच्या पक्षाला उपयोग झाला ना इतर कुणाला उपयोग झाला ना राज्याला उपयोग असं म्हणत राज ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली.
जेव्हा पृथ्वीराज चव्हाण आले तेव्हाच मी बोललो होतो की हे मराठी सिनेमातल्या व्हिलनसारखे दिसतात असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांची खिल्लीही राज ठाकरेंनी उडवली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची डोंबिवली या ठिकाणी सभा होती. त्या सभेत राज ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या राज्य कारभाराची खिल्ली उडवली.