वेब टीमजामखेड - कर्जत-जामखेडमधून विजय मिळविल्यानंतर शुक्रवारी नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी विजयी मिरवणूक काढली. तरुणाईचा जोश, ढोलताशांचा धडाका आणि प्रचंड गर्दीत जामखेडमध्ये ही मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत जेसीबी मिशिन्सच्या साह्याने गुलाल उधळण्यात आला. हा गुलाल उधळण्यासाठी तब्बल 28 जेसीबी मिशिन्स सर्व शहरातल्या चौकात लावण्यात आल्या होत्या. रोहित पवार असलेली गाडी जशी चौकात येत होती तसं कार्यकर्ते जेसीबीतला गुलाल उधळत होते. त्यामुळे सगळं शहर गुलालात माखलं गेलं होतं. अतिशय अटीतटीच्या लढतीत रोहित पवार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राम शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.
शरद पवारांचे नातू असल्याने रोहित यांच्या लढतीकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. रोहित यांची ही पहिलीच निवडणूक होती तर शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होते. विजयानंतर रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या घरी जावून त्यांची भेटही घेतली होती. त्यांच्या या कृतीचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं. रोहित पवार विजय झाल्यानंतर प्रथमच विजय रॅलीसाठी जामखेडमध्ये आले होते. आज जामखेड मध्ये तर उद्या कर्जत मध्ये पुन्हा रॅली काढण्याचे येणार आहे.