Theme Layout

Theme Translation

Trending Posts Display

Home Layout Display

Posts Title Display

404

We Are Sorry, Page Not Found

Home Page

वेब टीम
नवी दिल्ली - भारत-बांगलादेश यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेला य नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना 3 नोव्हेंबरला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान दिल्लीतील सामन्यावरून सध्या वादंग सुरू आहेत. कारण दिल्लीत हवेतले पोल्युटंट प्रचंड वाढले आहेत.
सध्या दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स AQI म्हणजे हवेतल्या घातक कणांची संख्या 500च्या वर पोहोचली आहे. त्यामुळे हे प्रमाण 0 ते 50 दरम्यान असेल तरच हवा चांगली असल्याचं मानलं जातं. दिल्लीची हवा हिवाळ्यात वाईट होते आणि AQI 400 च्या आसपास पोहोचतो. या वेळी तो 500च्यावर पोहोचल्यामुळे Emergency जाहीर केली आहे. त्यामुळं येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. म्हणूनच दिल्लीमध्ये सामना होऊ नये, अशी मागणी पर्यावरणमित्रांनी आणि खासदार गौतम गंभीर यांनी केली आहे.
दिल्लीतील हवा दुषित असली तरी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि दिल्ली जिल्हा क्रिकेट संघ (Delhi District Cricket Association) यांनी सामना ठरलेल्या वेळेनुसार आणि दिल्लीमध्येच होणार असल्याचे सांगितले. या सगळ्यात आता बांगलादेशच्या प्रशिक्षकांनी प्रदूषणावर गोंधळ घालणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.

बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डोमिंगोयांनी दिल्लीमध्ये होणाऱ्या टी-20 सामन्यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. सध्या बांगलादेशचा संघ कोटलामध्ये मास्क परिधान करून सराव करत आहेत. याबाबत डोमिंगो यांनी, “प्रदूषणामुळं कोणी मरणार नाही आहे. प्रदूषण आमच्या देशातही आहे. त्यामुळं दिल्लीतील दुषित हवा आमच्यासाठी मोठी गोष्ट नाही. कारण जगातल्या सर्व देशांमध्ये ही समस्या आहे”, असे सांगितले.