Theme Layout

Theme Translation

Trending Posts Display

Home Layout Display

Posts Title Display

404

We Are Sorry, Page Not Found

Home Pageवेब टीम

मुंबई - एकीकडे वयाच्या ऐंशीतही शरद पवार ओला दुष्काळामुळे पाहणी दौरा करत आहेत, तर दुसरीकडे नातू रोहित पवार मात्र विजयी मिरवणुकीत गुलाल उधळत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. अवकाळी पावसानं शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. संपूर्ण पीकं पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. काल सातारा दौरा केल्यानंतर आज शरद पवार नाशिक दौर्‍यावर होते. तिथे शेतकर्‍यांच्या भेटीगाठी करून त्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तर दुसरीकडे नातू रोहित पवारांची मात्र जामखेडमध्ये विजयी मिरवणूक झाली. यावेळी ढोल-ताशांचा गजरात 30 जेसीबी लावून गुलालाची उधळण करण्यात आली.


विधानसभेच्या निकालानंतर शरद पवारांनी नवनिर्वाचित आमदारांना ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहा, असा सल्ला दिला होता. या सल्ल्याचा विसर पवारांचे नातू रोहित पवारांनाच पडलेला दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरातून रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जेसीबीने गुलाल उधळून रोहित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. निवडून आल्यानंतर रोहित पवार आज पहिल्यांदा जामखेड शहरात आले होते. जनतेचं आभार मानण्यासाठी या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं.


या मिरवणुकीसाठी जामखेड शहरातील मिरवणूक मार्गावर तब्बल 30 जेसीबी आणि 10 क्रेन आले होते. अहमदनगर रोडवरील विश्रामगृहापासून सुरू झालेली मिरवणूक तीन किलोमीटर वर असलेल्या बाजार समिती जवळ थांबली.


गेल्या 30 वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. या मतदारसंघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्या लढत झाली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे होतं. यात रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा 43 हजार मतांनी पराभव केला. बर्‍याच वर्षांनी या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाल्याने मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता.


राज्यात इतका सत्तासंघर्ष सुरु असताना शरद पवार मात्र थेट बांधावर पोहोचले. शेतकर्‍यांचे डोळे पुसले. उद्ध्वस्त शिवारांची पाहणी केली. त्याचवेळी त्यांचे नातू रोहित पवार गुलालात माखले होते.