Theme Layout

Theme Translation

Trending Posts Display

Home Layout Display

Posts Title Display

404

We Are Sorry, Page Not Found

Home Page

वेब टीम
नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री एक बेवारस बॅग आढळली. प्राथमिक तपासात बॅगमध्ये विस्फोटक असल्याचे समोर आले. दरम्यान, हे विस्फोटक आरडीएक्स आहे का आयईडी, हे स्पष्ट झाले नाही. विमानतळावरील काही प्रवाशांनी बॅगमधून वायर बाहेर आलेले पाहिले. त्यानंतर बॉम्ब स्क्वॉडने बॅगला विमानतळाबाहेर नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची ही बॅग टर्मिनल-3 च्या अरायव्हल पॉइंटजवळ असल्याचे सीआयएसएपच्या जवानांना कळाले. वेबारस बॅग असल्याचे कळताच विमानतळ रिकामे करण्यात आले. त्यानंतर डॉग स्क्वॉड आणि एक्सप्लोसिव डिटेक्टरच्या मदतीने बॅगची तपासणी करण्यात आली.
टर्मिनल-3 मधून आंतरराष्ट्रीय विमानं उड्डाण करतात
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिसांनी विमानतळाची संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता प्रवाशांना आत येऊ दिले. या सर्व घटनेदरम्यान विमानतळाबाहेरील रस्ताही बंद करण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीच्या टर्मिनल 3 मधून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होते.