Theme Layout

Theme Translation

Trending Posts Display

Home Layout Display

Posts Title Display

404

We Are Sorry, Page Not Found

Home Page

पुणे - राज्यातील महत्त्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी महापोर्टलद्वारे विविध पदांसाठी ज्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहेत, त्या संशयास्पद आहेत. या परीक्षांदरम्यान राज्यभरात अनेक गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे लाखाे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्वरित लक्ष घालून महापोर्टल बरखास्त करावे. घेतल्या गेलेल्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी राज्यभरातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने केली आहे. दोन दिवसांच्या मुदतीत मुख्यमंत्र्यांनी महापोर्टलवर कारवाई न केल्यास विद्यार्थी तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
महापोर्टलच्या माध्यमातून विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहेत. गेल्या महिन्यात तलाठी, वनरक्षक आदी पदांसाठी परीक्षा झाल्या. सध्या कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा सुरू आहेत. ऑनलाइन परीक्षांदरम्यान पुण्यासह अन्य ठिकाणी परीक्षा केंद्रात अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. पुण्यात सोमवारी अलार्ड कॉलेजमध्ये सेंटर बंद पडल्याने परीक्षाच झाली नाही. त्यासाठी वीजपुरवठ्यातील व्यत्ययाचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, मंगळवारीही पुन्हा हाच प्रकार घडला आणि परीक्षा होऊ शकली नाही. सर्व संगणक बंद पडणे, सिस्टिम हँग होणे, पासवर्ड न घेणे, संगणकसंख्या अपुरी असणे..असे प्रकार घडले. कात्रज येथील भारती विद्यापीठ सेंटरमध्येही असाच प्रकार घडल्यावर तीन तास विद्यार्थ्यांना कोंडून ठेवण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
केंद्रावर जनरेटरही नाही
अलार्ड येथील सेंटरवर परीक्षा देणारा महेश इंगोले हा विद्यार्थी म्हणाला,‘सकाळी साडेआठ वाजता प्रवेश देण्यात आला आणि साडेनऊ वाजता प्रवेश बंद करण्यात आला. तोपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणीही पूर्ण झाली नव्हती. हा दोष विद्यार्थ्यांचा नाही. पण नुकसान मात्र विद्यार्थ्यांचे झाले. ठीक दहा वाजता पासवर्ड दिला जातो आणि मग परीक्षा सुरू होते. यापैकी काहीच घडले नाही. परीक्षांच्या केंद्रावर जनरेटर बॅकअप नसणे, हेही संशयास्पद वाटते.